विनाकेमिकल कुंकू तयार करा🔸



 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

      

   *🔸विनाकेमिकल कुंकू  तयार करा🔸*


*घरी कुंकू कसं तयार करायचं* ?


*सौंदर्याचं लेणं म्हणून सवाष्णींसाठी कुंकवाचं वेगळ महत्व आहे. मात्र हल्ली बाजारात मिळणारं कुंकू भेसळयुक्त असण्याची शक्यता असते. याच्या वापरामुळे अनेक त्वचाविकार अथवा अ‍ॅलर्जी संभावते. म्हणूनच घरच्या घरी कुंकू कसं तयार करायचं? आज त्याबद्दल जाणून घेणार आहोत.*


*साहित्य* : 


*एक किलो हळद पावडर, 40 ग्रॅम तुरटी पावडर,120 ग्रॅम टाकणखार पावडर, 20-25 लिंबाचा रस, दोन चमचे तिळाचं तेल इत्यादी.*


*कृती* 

*हळद पावडरमध्ये तुरटी पावडर, टाकणखार पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करा. हे सर्व जिन्नस एकजीव होईपर्यंत मिसळा. मिश्रण दोन ते तीन दिवस सावलीमध्ये सुकवावेत. या दरम्यान हळदीचा रंग बदलताना दिसेल. हे मिश्रण तांबड्या रंगाचं होईल. 2-3 दिवस वाळल्यानंतर यात तिळाचं तेल मिसळा. तेलाची मात्रा जास्त ठेवू नका अन्यथा, याची पेस्ट तयार होईल. आता ही पावडर बरणीमध्ये भरून ठेवा. तयार झालेलं हे कुंकू बराच काळ सुस्थितीत राहील. घरगुती पद्धतीनं, कुठल्याही रासायनिक घटकांचा सहभाग नसणारं हे कुंकू वापरल्यामुळे दुष्परिणाम होण्याचा धोका राहत नाही.*

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

Comments