डायलिसिस म्हणजे काय?
📙 *डायलिसिस म्हणजे काय ?* 📙
***********************************
आपल्या शरीरात अनेक जीवरासायनिक क्रिया सतत चालू असतात. सजीवाच्या जगण्यासाठी त्या आवश्यक असतात. पण यापैकी प्रत्येक क्रियेमध्ये काही ना काही टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. ते साचून राहणं आरोग्याला घातक ठरतं. त्यामुळे त्यांचा नियमित आणि वेळेवर निचरा होण्याची गरज असते. त्याशिवाय आपण आपल्या शरीरावर नकळत सतत अत्याचारही करत असतो. शरीराला सहन न होणारे खाद्यपदार्थ आपण खात असतो. कोणी जास्त तेलकट पदार्थ खातो. कोणी नको तितके तिखट असलेले पदार्थ खातो. त्यांच्या पचनातून मग काही शरीराला घातक पदार्थ उच्छिष्ट म्हणून उरतात. त्यांचाही निचरा होणं आवश्यक असतं. यापैकी जे टाकाऊ पदार्थ रक्तात उतरतात ते त्यातून काढून घेऊन रक्त शुद्ध करण्याची जबाबदारी मूत्रपिंडावर असते. मूत्रपिंड हे रक्त चाळून त्यातले टाकाऊ पदार्थ विरघळवून ते शरीरातून बाहेर टाकण्याचं काम करत असतात. याशिवाय शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल राखण्याचं कामही मूत्रपिंडांना करावं लागतं. उन्हाळ्यात भरपूर घाम येतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होतच असतो. अर्थात मूत्रातून अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्याची आवश्यकता नसते. हिवाळ्यात नेमकी याविरुद्ध परिस्थिती असते. त्या काळात घाम येत नाही. सहाजिकच अतिरिक्त पाण्याचा निचरा मूत्रातून करणं आवश्यक असतं. त्या दिवसांमध्ये वरचेवर लघवी लागते याचं कारणही हेच आहे.
जोवर मूत्रपिंडांचं काम बिनबोभाट चालू असतं तोवर रक्तात कचरा साठत नाही. पण काही कारणांनी मूत्रपिंड निकामी होऊ लागतात. मधुमेहासारख्या काही व्याधींचाही त्यात सहभाग असतो. अशा वेळी मग रक्ताचं शुद्धीकरण होत नाही. रक्तात टाकाऊ पदार्थ साचून राहतात. रक्तातील मूत्र व नत्र वायू यांचं मोजमाप करून त्याची खातरजमा करून घेतात येते. त्याशिवाय रक्तातील क्रिएटीनीन या रसायनाचं प्रमाणही अशा वेळी वाढलेलं दिसून येतं.
यावर उपाय म्हणून मग शरीराबाहेर यंत्राच्या मदतीने रक्त शुद्ध करावं लागतं. याच प्रक्रियेला डायलिसिस असं म्हणतात. यात शरीर कृत्रिम मुत्रपिंड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एका यंत्राला जोडलं जातं रक्त त्या यंत्रांमधून फिरतं. त्या यंत्रात डायालिझेट नावाचं द्रवही खेळत असतं. रक्ताचा त्याच्याशी थेट संबंध येत नाही. पण यंत्रात असलेल्या काही अतिशय तलम अशा चाळण्यांमधून त्यातील टाकाऊ पदार्थ त्या डायालझेटमध्ये उतरतील अशी व्यवस्था केली जाते. या चाळण्या एकतर्फी वाहतूक करणाऱ्या असतात. असं रक्त मग परत शरीरात घातलं जातं. मूत्रपिंडं शरीराचाच एक भाग असल्यामुळे ती सतत कार्यरत राहून रक्ताचं सतत शुद्धीकरण करत राहतात. डायलिसिस यंत्र मात्र शरीराला जोडलेलं असतं तोवरच हे काम करतं.
*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*

Comments
Post a Comment