कासव -एक प्रतिक

🏵🌻🌺🙏🏼🌺🌻🏵
*!! कासव- एक मांगल्याचे प्रतिक !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जगभरात पुजनीय असलेल्या कासवाचे संरक्षण, संवर्धन व संक्रमण होण्यासाठी व मांगल्याचे प्रतिक असलेल्या कासवाप्रती ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा हा दिन!

कासव!
शुभ अथवा मांगल्याचे6 प्रतिक!
आपल्या हिंदू धर्माच्या पुराणानुसार भगवान श्री विष्णूंचा दुसरा अवतार अर्थातच "कच्छप अवतार"!
म्हणून हिंदू धर्मात कासवाला अथवा कासवाच्या प्रतिमेला अतिशय महत्व आहे!

-----------
*कासव*
-------------
कासव हा एक उभयचर प्राणी आहे. कासवांचे आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त असते. कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कासवाच्या शरीराचे शीर्ष, मान, धड आणि शेपूट असे चार प्रमुख भाग असतात.

*कासवांचे प्रकार*

*१)जमिनीवरील कासव*

याला इंग्रजीत Tortoise म्हणतात. हे पोट आणि पाठ या दोन्ही बाजूंनी टणक असते. याच्या बोटांमध्ये पडदे नसतात.

*२)गोड्या पाण्यातील कासव*

ही कासवे विहिरीत आणि नद्यांत राहतात. दीर्घायुषी असल्याने यांचा आकार खूप मोठा होऊ शकतो. इंग्रजीत यांना Sweet Water Turtle म्हणतात.हिबकासवे जमिनीवरही राहू शकतात.

*३) समुद्री कासव*

समुद्रात राहणार्‍या कासवांना समुद्री अथवा सागरी कासव असे म्हणतात. ही कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यांतील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार जाती भारताच्या समुद्री किनार्‍यावर आढळून येतात.

-------------------------------------------------
*मंदिरात कासव असण्याचे महत्त्व काय आहे.*
-------------------------------------------------

आपणास माहिती आहे का कासव(मादी)ही आपल्या पिल्यांना कधीच दुध पाजत नसते तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्या कडे वात्सल्य भावनेने पाहावे ज्यामुळे न माघता आपल्या सर्व ईच्छा पुर्ण व्हावा या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत. श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असणेकासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी', अशी इच्छा निर्माण झाली.

कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्‍याच्या समोर स्थान प्राप्‍त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी', अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्‍याच्या समोर स्थान प्राप्‍त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.

---------------------
*कासवाचे गुण*
---------------------
१. शरणागत भाव असणे :
यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते.

२. सत्त्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्‍नरत असणे :
काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे, म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे.

३. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे :
आध्यात्मिक उन्नतीची तीका इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

४.कासवाला ६ पाय असतात तसेच माणसाला ६ शत्रू असतात

काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर

कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे

५. कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते

त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे.

६. कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा

यांकरीता कासव मंदिरात असते.

७. कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते

त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते.


*कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ*

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ `कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते', असा आहे.


✴✳✴✳✴✳✴

Comments