सेंद्रिय खत - निंबोळी अर्क

👍 *सर्वोत्तम सेंद्रिय खत 'निंबोळी अर्क'*

*LetsUp । Agri*

सध्याच्या काळात रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची प्रत खालावली आहे. त्यामुळे जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत. अशात सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. सेंद्रिय शेतीचे मुख्य घटक म्हणजे सेंद्रिय खते. त्यातील एक 'निंबोळी अर्क'. आज त्याबाबत जाणून घेऊयात...

💁‍♂ *5% निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत* :

▪ उन्हाळ्यात निंबोळ्या जमा कराव्यात. त्या चांगल्या वाळवून साफ कराव्यात व साठवण करावी.
▪ फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तेवढ्या बारीक कराव्यात. 5 किलो चुरा 9 लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा.
▪ 1 लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबण्याचा चुरा वेगळा भिजत ठेवावा.
▪ दुसऱ्या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क पातळ फडक्यातून चांगला गाळून घ्यावा. त्या अर्कात 1 लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा अर्क एकूण 10 लिटर होईल एवढे पाणी टाकावे.

वरीलप्रमाणे तयार केलेला एक लिटर अर्क पाण्यात मिसळून ढवळावा व फवारणीसाठी वापरावा. अशा प्रकारे निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावा.

निंबोळी अर्क अधिक प्रभावी करण्यासाठी अर्ध्या किलो हिरव्या मिरचीचा बारीक ठेचा किंवा 200 ग्रॅम तंबाखू पूड (पाण्यात उकळून थंड करून अर्क काढावा) किंवा 250 ग्रॅम गूळ किंवा निरमा पावडरची 10 लिटर अर्कामध्ये फवारणीपूर्वी 24 तास अगोदर टाकून भिजवा. हे मिश्रण 3-3 तासांच्या अंतराने ढवळत रहा व वापरण्यापूर्वी फडक्याने गाळून घ्या.

📍 निंबोळी अर्क फवारणीमध्ये किमान 12 ते 15 दिवसांचे अंतर असावे तसेच कडक उन्हात फवारणी टाळावी.

🌐 

Comments