बाप सहसा कळत नसतो

 *बाप ओळखता येत नसतो.*


कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो, 

कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो,

कधी बाप रागामुळे वाईट असतो,

धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो....

अश्यातलाच बाप सर्वांना माहीत असतो...

पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणेही ऐकून घेतो. 

आतल्या आत हा बाप तसा रोजच रडत असतो...


प्रत्येकाच्या गरजांसाठी एकटा बापच वाहत असतो. 

सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो.....

मुलांना पायावर उभं करणारं औषध म्हणजे बापाचा राग असतो. 

रागामागे मुलांचं सुख पाहणारा हतबल बापच असतो.....


आईसारखा बाप ओळखायला येत नसतो. घडवण्याचं काम हा बापच करत असतो.....


बापाला कमी पडण्याची परवानगी नसते, 

बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते, 

बापाला थकण्याची परवानगी नसते,

आणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते. 


एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो.

नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकटाच बसून असतो....


हा बाप सहजच ओळखायला येत नसतो. 

अश्रू दिसू देत नसतो, मनातलंही बोलत नसतो. म्हणून बाप सहसा कळत नसतो

🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

Comments