सरस्वती स्तोत्र

 





🌹 *श्रीसरस्वती स्तोत्रम्* 🌹



*वाञ्छाधिकेष्टफलदाननिबद्धदीक्षा ।*

*वाक्चातुरीविधुतकेलिकुलाभिमाना ।*

*वागीशविष्णुभवपूजितपादपद्मा ।*

*वाग्जाड्यदास्तु भवतां वचसा सवित्रि ॥ १ ॥*

*शृंगादिवासनिरतावरतुंगभद्रा-*

*तीरप्रचाररसिका कलिकल्मषघ्नी ।*

*कीलालजातभवमोदसुखाब्धिराका ।*

*वाग्जाड्यदास्तु भवतां वचसा सवित्रि ॥ २ ॥*

*कल्याणशैलधनुषः सहजा कृपाब्धि-*

*र्हस्ताम्बुजात्तकजपुस्तककीटमाला ।*

*पद्मोद्भवादिमवृषालिरुपात्तदेहा ।*

*वाग्जाड्यदास्तु भवतां वचसा सवित्रि ॥ ३ ॥*      

*वैराग्दाननिरता नतमस्करीशा ।*

*भोगीन्द्रगर्वविनिवारणदक्षवेणी ।*

*आम्नायशीर्षततिगेयनिजापदाना ।*

*वाग्जाड्यदास्तु भवतां वचसा सवित्रि ॥ ४ ॥*

*स्वान्तानन्दनिमग्नस्वान्तां प्रकरोतु सन्ततं कृपया ।*

*यदुनन्दनसुखवाणी वाणी वीणालसत्कराम्भोजा ॥ ५ ॥*

*॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वतीविरचितं सरस्वतीस्तोत्रं संपूर्णम् ॥*


*मराठी अर्थ*


१) आपल्या भक्तांच्या अपेक्षेपेक्षा जास्त फळ देणाचे जिचे व्रतच आहे, जी आपल्या वाणीच्या चातुर्याने केवळ उपभोग हेच जीवनध्येय मानणार्‍यांचा पूर्ण गर्वहरण करते व जी वैखरी, मध्यमा, पश्यंति व परा या वाणींचा मूलस्रोत आहे, अशी सरस्वतीमाता आपणा सर्वांच्या बुद्धिंतील, वाणीतील सर्व दोष नाहीसे करो.    

२) जिला श्रृंगेरी पर्वतावर राहणे अतीशय आवडते, जी पवित्र अशा तुंगभद्रा नदीच्या तीरावर आनंदाने विहार करते, जी कलियुगांतील सर्व पापांचा नाश करते, जी सागराप्रमाणेच विशाल असणार्‍या संसारसुख सागराची जणू पौर्णिमाच आहे व जी वैखरी, मध्यमा, पश्यंति व परा या वाणींचा मूलस्रोत आहे, अशी सरस्वतीमाता आपणा सर्वांच्या बुद्धिंतील, वाणीतील सर्व दोष नाहीसे करो.  

३) सरस्वतीमाता करुणाकृपेचा सागर आहे. श्रीभगवंताची कृपाशक्ती म्हणून ती जीवाच्या बरोबर देहांत प्रवेश करते. तिने आपल्या करकमलांत कमल, पुस्तक व स्फटिकमाला धारण केली आहे. तिने ब्रह्मदेवाची पत्नी म्हणून देह धारण केला होता. जी वैखरी, मध्यमा, पश्यंति व परा या वाणींचा मूलस्रोत आहे, अशी सरस्वतीमाता आपणा सर्वांच्या बुद्धिंतील, वाणीतील सर्व दोष नाहीसे करो.  

४) सरस्वतीमाता आपल्या भक्तांना वैराग्यवैभवाचे दान देण्यांत अत्यंत दक्ष असते. ज्ञानाने नम्र झालेल्या विद्वानांची ती देवता आहे. आपल्या लांब केसांच्या वेणीने ती शेषनागाचेही गर्वहरण करते. सर्व उपनिषदांनी थोरवी वर्णन केलेल्या मोक्षाचेही दान करण्यास ती समर्थ आहे. जी वैखरी, मध्यमा, पश्यंति व परा या वाणींचा मूलस्रोत आहे, अशी सरस्वतीमाता आपणा सर्वांच्या बुद्धिंतील, वाणीतील सर्व दोष नाहीसे करो.  

५) जिच्या करकमलात वीणा शोभते आहे, अशी सरस्वतीमाता कृपाळू होऊन वासुदेवानंदसरस्वतींना सदासर्वदा आत्मानंदनिमग्न करो. 

अशा रीतीने श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित सरस्वती स्तोत्र संपूर्ण झाले.  


Comments