आई मातृदिनाच्या शुभेच्छा
https://youtu.be/lvThWqayoz4
आई तु नऊ महिने माझी किती काळजी घेतलीस गं !
आई या जगाला अजाणता मी तुझ्याशी एकदम कशी अजोड नाळ जोडली गं !
आई सदैव रडणारा मी तुझ्या स्पर्शाने आनंदीत होतो का गं !
आई अजुनही ना स्थिरावलेली माझी नजर तुलाच शोधते का गं !
आई अबोल मी तुझ्या सोबतीला कसा काढतोय आवाज गं !
आई एकाच जागेवर लोळणारा मी तुझ्या कडे येण्यासाठी रांगतो कसा गं !
आई नीटसं ही न बसणारा मी तुझ्या कडे कसा आलो धावत गं !
आई सवय तुझ्या हातानी घास भरवायची मी जेवायला लागलो स्व हातांनी कसा गं !
आई शाळेत तेच शिकवलं ते तु मला आधीच घरी शिकविलेलं गं!
आई शाळेत खुप भेटल्या मित्र मैत्रिणी पण तुच आहेस माझी Best Friend गं !
आई खेळतांना खेळ होते मित्र सारे पण आपल्यातल्या खेळण्याची मौजमजा काही वेगळीच गं!
आई कितीही लपवील्या समस्या माझ्या तरी तु कश्या जाणल्यास गं!
आई अवघडतल्या अवघड माझ्या प्रश्नांची सोप्पी उत्तरे तुझ्या कडे कशी गं!
आई कठिण निर्णायक आवड माझी तु कशी ओळखायची गं!
आई तु एवढं सगळं करून ही कधीच नाही कशी दमत गं!
आई एवढं हसरं घर तु आजारी पडल्यावर रुसल्या सारखं होतं का गं!
आई सगळं प्रसन्न वातावरण तु गेल्यावर होतं सारंच सुन्न गं!
आई प्रश्न अनेक उत्तर एकच आई गं!
आई तु आहेस देवी शक्ती जगदंबा गं!
आई आम्ही तुझ्याच भक्ती चे लेकरु गं!
https://youtu.be/lvThWqayoz4
🤰🏻🤱🏻👩🏻🍼👩👦👩👧👩👧👦👩👦👦👩👧👧https://youtu.be/lvThWqayoz4
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment