" देवा आता मलाही तिथे ने ! माझ्या कडून अर्धवट राहिली आई बाबांची भक्ती ."
" देवा आता मलाही तिथे ने ! माझ्या कडून अर्धवट राहिली आई बाबांची भक्ती ."
आई तुझी ही देवात होते गणती .
आई तु माझ्यासाठी अनमोल किंमती .
आई फक्त जन्मच नाही दिला तु आम्हाला .
आई या जगात धैर्याने तोंड देणं शिकवलं तु आम्हाला .
आई असं सारखं सारखं थोडीच शिकविते .
आई तिच्या कृतीतून सारं काही शिकवते .
आई असते वात्सल्याचं घर .
आई तुझ्या छाया वीना ओस पडले हे घर .
आई घरात होता मला तुझाच धाक .
आई आता परत फिरुनी येशील का मी दिल्या वर तुला हाक !!!.
आई तु असताना मी तुला खुप दुखावलं .
आई तरीहि तु माझ्या स्वप्नात येऊन माझ्यासाठी का गं रडतेस .
आई बाबा तुमच्यासाठी देवाकडे एकच मागणे मागितले आहे " या जन्मा जन्मातरीतुन तुमची मुक्ती ."
" देवा आता मलाही तिथे ने ! माझ्या कडून अर्धवट राहिली आई बाबांची भक्ती ."
Comments
Post a Comment