आई चा जन्मदिवस
आई चा जन्मदिवस
वाढदिवस म्हणजे वयाने वाढवणारा हा दिवस.पण आई तु तर वयोमान आयुष्यमान या सर्वांच्याच हि पलीकडची . एखाद्या दैदिप्यमान तार्याची आमच्या वर सदैव असणारी छाया.
आई तुला आता ही आमचीच वाटतें का काळजी . जेव्हा आम्ही द्विधा मनस्थितीत असतो तेव्हा आमच्या अंतर मनातून आलेली साद तुझीच असते. तुझ्या साठी काही पण करणं मला जमलेच नाही. तरीही तुझी एवढी धडपड.
आई तू असतांना मी काही नाही केलं . आता मात्र नेहमीच तुझी उणीव भासते.
आई तुला विचारायचे आहे की , कोणी जवळ असतें तेव्हा त्यांचं करनं नको नकोसं वाटतं. पण ते जेव्हा दुर जातात तेव्हा त्यांचीच आठवण येते.
आई म्हणतात ना की, जवळ असताना जाणीव नसते आणि दूर गेल्यावर किंमत कळते.
आई सदैव तु म्हणतेस ना आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुला म्हणतो ,
"तु जिथं असशील तेथे देव तुला सुखी ठेवो ."
आई अशी तर तु सदैव आमच्या जवळचं असतेस . अशीच राहो तुझी आम्हावर कृपेची छाया.
Comments
Post a Comment