वटसावित्री चे व्रत वर्षात दोनदा केले जाते

🙏🌹🤝🦚🕉️☯️🛐🦚🤝🌹🙏

*🙏🌹या लेखात आपण काय माहीती घेऊ शकतात*

*१)वटवृक्ष पोर्णिमा*
*२)सोपी पूजा विधी*
*३)वटव्रुक्षाची वैशिष्ट्य*
*४)आयुर्वेदिक द्रुष्टीने वडाच्या झाडाचे महत्त्व*
*५)वटसावित्री चे व्रत वर्षात दोनदा केले जाते*
*६)वट पोर्णिमा निमित्ताने नवीन बदल करू*
*७)दिन विषेश*
*८)मनाचा संयम*
*९)जागतिक पर्यावरण दिन*
*१०)मानसिक पराभुतता*

 ---------------------------------------
*ज्येष्ठ पौर्णिमा..!*
*अर्थातच वटसावित्री पौर्णिमा*
----------–----------------------------
या वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व सुवासिनी वडाच्या झाडाची पुजा करतात.
वटवृक्ष हा शिवरूपी आहे.
शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पुजा केली जाते; कारण कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जीवाला फायदा होतो. 
*अशा प्रकारे वटवृक्षाची पुजा करण्यामागे सती सावित्रीच्या कथेचा पौराणिक संबंध तर आहेच,*
 तसेच ...
*वृक्षांना देव मानून वृक्षपूजा करण्याचा आणि त्या वृक्षपूजनेतून वृक्षांप्रति ऋण व्यक्त करण्याचा संस्कार देणा-या भारतीय संस्कृतीचा हा उल्लेखनीय सण सुध्दा आहे!*

*हे वटसावित्री पौर्णिमेचे व्रत, सुवासिनी आपल्या पतीला व स्वतःला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात!*
----------------------------------------
*वटसावित्री  पौराणिक कथा* 
-----------–---------------------------
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली.
सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. महर्षि नारदमुनींना मात्र सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन सत्यवानासोबत आपल्या सासू सास-यांची सेवा करू लागली.
अखेर वर्षपूर्ती झाल्यावर सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला.
यमधर्म तिथे आपल्या यमदूतांसह आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला.
अखेर कंटाळून यमाने तिला सांगितले की,
"हे सावित्री! पतीचे प्राण परत मागणे सोडून तू इतर कोणतेही तीन वर माग!"
यावर कोणते तीन वर मागावेत की, जेणेकरुन आपल्या पतीचेही प्राण परत मिळतील आणि सासू-सास-यांचेही भले होईल याबाबत सावित्रीने क्षणभर विचार केला..

आणि ती यमराजांना म्हणाली,
"हे यमदेवा!
मला माझ्या पतीच्या प्राणांहुन दुसरे काहीही प्रिय नाही! आणि आपण नेमके तेच सोडून इतर तीन वर मागण्याचा आग्रह धरीत आहात! ठिक आहे! माझ्या नशिबात असेल ते घडेल! मी आता आपल्या आज्ञेप्रमाणे तीन वरदान मागत आहे! कृपया अनुग्रह व्हावा! पहिल्या वरदानाने माझ्या सासू-सास-याचे डोळे ठिक व्हावेत, दुस-या वरदानाने त्यांचे गेलेले राज्य परत मिळावे व तिस-या वरदानाने मला मातृसुख मिळण्यासाठी पुत्रप्राप्ती व्हावी अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे!"
यमराजांनी प्रसन्नतेने सावित्रीला "तथास्तु!" म्हटले तेंव्हा आपण शब्दांमध्ये वचनबध्द झाल्याची यमराजांना जाणीव झाली व त्यांना सत्यवानाचे प्राण परत करावे लागले!
*सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रताचे आचरण करतात.*
या वटसावित्री पौर्णिमेच्या पुजाविधीत, सती सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत.
-------------------------------------

------------------------------------
 ----------------------------------------
*व्रताची सोपी पूजा विधी*
----------------------------------------
भारतीय संस्कृतीमध्ये वट सावित्री पौर्णिमा व्रत आदर्श स्त्रीत्वाचे प्रतीक बनले आहेत. वट पूजेशी निगडित धार्मिक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक बाबींमध्ये वट आणि सावित्री दोघांचे महत्त्व आहेत. पौर्णिमेला साजरे केले जाणारे हे व्रत कैवल्य सौभाग्य आणि अपत्य प्राप्तीमध्ये साहाय्य करणारे आहेत. सुख भरभराटी आणि अखंड सौभाग्याचं लेणं देणाऱ्या या वट सावित्री पौर्णिमा हे व्रत केले जाते

 *जाणून घेऊ या व्रताचीसोपी पूजा विधी*

*पूजा साहित्य:-*

हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी (काळी पोत), अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.

*पूजन विधी:-*

प्रथम सौभाग्यवती स्त्रीने 
*‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’,*
असा संकल्प करावा.
स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा.
प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी.
गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी.
नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे.
हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.
वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी.
वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या.
हे मंत्र म्हणावे-
*” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।*
*तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।*
*अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।*
*अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”*

५ सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.
सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.
या प्रकारे प्रार्थना करावी - 
*`मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’.*
अशी प्रार्थना करावी
-------------------------------------

---------------------------------------
 ---------------------------------------
*वट वृक्षाबद्दलची वैशिष्ट्ये* 
*जाणून घेऊ या*
----------------------------------------
* पुराणात असे स्पष्ट केले आहे की वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं वास्तव्य आहे.
* वट पूजेशी निगडित धार्मिक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक पैलू आहेत.
* वटवृक्ष ज्ञान आणि सृष्टीचे प्रतीक आहे.
* भगवान बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली होती.
* वट वृक्ष हे मोठे असून पर्यावरणच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत, कारण या झाडावर अनेक प्राणी आणि पक्ष्यांचे जीवन अवलंबून असतं.
* हे वातावरणाला शुद्ध करून मानवाच्या गरजपूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
* तत्त्व ज्ञानाच्या दृष्टिकोनातून वट वृक्ष दीर्घायुष्य आणि अमरत्वाचे प्रतीक म्हणून स्वीकारले जाते.
* वट सावित्री व्रतामध्ये बायका वट म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतात.
* वडाच्या झाडाच्या खाली पूजा करून कथा ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
* वडाची पूजा आणि सत्यवान सावित्रीच्या कथेचे स्मरण करून देण्यासाठी हे व्रत वट सावित्री या नावाने प्रख्यात आहे.
* धार्मिक मान्यतेनुसार वडाची पूजा दीर्घायुष्य, सुख- समृद्धी आणि अखंड सौभाग्याचे लेणं देण्यासह सर्व प्रकारचे कष्ट आणि दुःखाचा नाश करणारी आहेत.
* प्राचीन काळात मनुष्य इंधन आणि आपल्या आर्थिक गरजापूर्ण करण्यासाठी लाकडांवर अवलंबून असे. पण पावसाळा झाडे बहरण्यासाठी, वाढण्यासाठी महत्त्वाचा असतो. त्याचसोबत अनेक प्रकारांचे विषारी प्राणी अरण्यात वावरत असतात. म्हणूनच मानव जीवनाच्या संरक्षणासाठी आणि पावसाळ्यात झाडे झुडुपं तोडण्यापासून वाचविण्यासाठी अशे व्रत कैवल्य धर्माशी जोडून दिले आहेत. जेणे करून झाडे झुडुपं बहरत राहो आणि त्यांच्यापासून आपल्या सर्व गरजा दीर्घकाळापर्यंत पूर्ण होत राहो.

भारतीय संस्कृतीमध्ये वट सावित्री पौर्णिमा व्रत आदर्श स्त्रीत्वाचे प्रतीक बनले आहेत. वट पूजेशी निगडित धार्मिक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक बाबींमध्ये वट आणि सावित्री दोघांचे महत्त्व आहेत. पौर्णिमेला साजरे केले जाणारे हे व्रत कैवल्य सौभाग्य आणि अपत्य प्राप्तीमध्ये साहाय्य करणारे आहेत. सुख भरभराटी आणि अखंड सौभाग्याचं लेणं देणाऱ्या या वट वृक्षाबद्दलची वैशिष्ट्ये
या व्रत कैवल्याची वैज्ञानिक आणि व्यावहारिक गोष्ट बघितल्यावर या व्रत कैवल्याची सार्थकता दिसून येते.
----------------------------------------

---------------------------------------------------------------------------
*आयुर्वेद शास्त्रानुसार*
 *वडाच्या झाडाचे महत्व*
----------------------------------
*आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो.वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.*

 १. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात.

 २. वृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे.

३. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते.

४. या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो चीक निघतो त्याचा औषध मध्ये मलामा सारखा उपयोग होतो. 

५.विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा, चिखल्या ठिक होण्याासाठी पण चीक गुणकारी आहे. 

६. कोणत्याही अवयवात लचक भरणे किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखर्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात. 

७. ताप कमी होण्यास ह्याचा पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम येऊन शरीराचा दाह काम होतो

८.पोटात जंत झाल्यास पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देतात. आव, अतिसार यावर पारंब्या तांदुळाच्या धुवनात वाटून त्यात ताक घालून देतात. 

 _९. वडाचे पान - अंगावरून पांढरे जाणे, गर्भाशयाला सूज येणे इ. विकारांवर औषध म्हणून उपयोगी पडते. तोंड आले असता याच्या काढ्याने गुळळ्या कराव्या. गर्भ टिकून रहाण्यासाठी तसेच इच्छित संतती साठी वडाच्या कोंबाचा उपयोग होतो._  

 *वडाच्या फुलाचे,कोंबाचे,डहाळीचे,पानांचे फायदे आहेत. त्याने मनुष्याच्या आरोग्याला फायदा होतो. तो कसा ते पाहू :-*

१) वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात “ऑक्सिजन” वातावरणात सोडत असते.
२) भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते.
३) वड उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी, बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असतात.
४) वडाच्या झाडामध्ये ढगातून पाऊस खेचून आणण्याची ताकद आहे असे म्हंटले जाते. जिथे वडाची झाडे जास्त तिथे पाऊस चांगला पडतो.
५) वडाचा आयुर्वेदिक उपचारासाठीही उपयोग होतो. वडाच्या पारंब्यांच्या रसाने केशवर्धन होते. पारंब्यांच्या काढा शक्तिवर्धक,बुद्धिवर्धक आहे.
६) गर्भधारणा होण्यासाठी आणि गर्भधारणा झाल्यानंतर वडाचा आयुर्वेद शास्त्राप्रमाणे औषधोपचार करता येतो.
७) गर्भधारणा झाल्यानंतर आधीच्या काळी बाळ सुदृढ असावे ह्यासाठी ठराविक नक्षत्रावर “पुसंवन”हा विधी केला जायचा. वडाच्या कोवळ्या कोंबाला गायीच्या कच्च्या दुधात वाटून ठरावीक नक्षत्रावर, ठरावीक नासिकेत त्याचा रस आयुर्वेदाचार्यांकडून घेतला जायचा.
८) वडाच्या सालीचा काढा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत समस्येत उपयोगी ठरतो.
९) वड हा मुळात शीत असल्याने पित्तावर गुणकारी आहे.
१०) उन्हाळ्यात त्वचाविकारांचा प्रादुर्भाव असतो. तेंव्हा वडाच्या झाडाच्या चिकाचा उपयोग होतो.
११) यकृताच्या समस्यांवर वडाच्या झाडाचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहे.
म्हणजेच वडाच्या शीतकारी गुणधर्मामुळे उन्हाळ्यात सर्वांसाठी उपयोगी असा हा वटवृक्ष.
उन्ह्याळ्यात या वृक्षामुळे हवेत आद्रता सोडली जाते त्यामुळे याच्या छायेत गारवा मिळतो. अशाप्रकारे , अनन्य साधारण महत्व असलेले हे झाड !

*ज्याच्या घराजवळ असेल , तो आजकालच्या प्रदूषणाच्या जगातही प्राणवायूने श्रीमंतच म्हणावा लागेल .*
----------------------------------------

--------------------------------------- -
-------------------------------------
*वट सावित्रीचे व्रत कैवल्य*
*वर्षातून दोन वेळा केले जाते.*
----------------------------------------
अनेक लोकं वैशाख अमावास्येला देखील हे व्रत करतात. तसेच महाराष्ट्रात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला सवाष्ण स्त्रिया हे व्रत करतात. 
*पण प्रश्न असा उद्भवतो की हे व्रत कैवल्य दोन वेळा का केले जाते.?*

१) स्कन्द आणि भविष्य पुराणानुसार वट सावित्री व्रत(उपवास) ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जातं. परंतु निर्णयामृतादिच्या अनुसार हे व्रत वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अवसेला केले जातं. भारतात दोन मुख्य पूर्णिमानता आणि अमानता दिनदर्शिका प्रचलित आहे. ह्यामध्ये जास्त अंतर नसून फक्त तिथी वेगळ्या आहेत. पूर्णिमानता दिनदर्शिकेनुसार वट सावित्रीचे व्रत हे वैशाख महिन्यातील अवसेला साजरी केली जाते. ज्याला वट सावित्री अमावस्या म्हणतात. तर अमानता दिनदर्शिकेनुसार हे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी करतात ज्याला वट सावित्री पौर्णिमा देखील म्हणतात.

२) वट सावित्रीचे व्रत विशेषतः उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये प्रचलित आहे. तर वट पौर्णिमेचे व्रत महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भारतात प्रचलित आहे.

३) वट सावित्रीचे व्रत सवाष्ण बायका आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळविण्यासाठी आणि त्याचा सौंख्यासाठी करतात. दोन्ही व्रतांमागील पौराणिक कथा दोन्ही दिनदर्शिकेमध्ये एकसारखीच आहे.

४) दोन्हीही व्रत करताना बायका वडाच्या झाडाची पूजा करून त्याचा भोवती सूत गुंडाळतात. पुराणांमध्ये हे स्पष्ट केलं आहे की वडाच्या झाडांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांचा वास आहे. श्रद्धेनुसार हे उपवास करणाऱ्या स्त्रीच्या नवऱ्याचे अकाळी मृत्यू योग टाळता येतो. वडाचे झाड आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्याची क्षमता ठेवणारे आहे.

५)  वडाची पूजा आणि सावित्री सत्यवानाच्या कथेची आठवण करून देणारे हे व्रत वट सावित्री म्हणून ओळखले जाते. या उपवासात बायका वडाच्या झाडाची पूजा करतात. सती सावित्रीची कहाणी ऐकूनच किंवा पठण करून सवाष्ण बायकांची अखंड सौभाग्याची इच्छा पूर्ण होते. या व्रताला सर्व प्रकारच्या बायका (कुमारिका,सवाष्ण, वैधव्य आलेल्या, कुपुत्रक आणि सुपुत्रक ) करू शकतात. या व्रताला बायका अखंड सौभाग्य मिळविण्यासाठी करतात.
---------------------------------------

---------------------------------------------------------------------------
*चला तर मग या*
*वटपौर्णिमेच्या निमित्ताने* 
*एक नवा बदल करू या.* 
---------------------------------------
*पतीपत्नीचे नाते जन्मोजन्मी अधिकाधिक बहरण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू या."* 
 यंदाच्या वटपौर्णिमेपासून आपल्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 

ज्याप्रमाणे वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून जन्मोजन्मासाठी साथ मागितली जाते. त्याचप्रमाणे पती-पत्नीने महत्त्वाच्या गोष्टी आचरणात आणून जन्मोजन्मांचे हे ऋणानुबंध अधिकच घट्ट करायचे आहेत.

*१)विश्‍वास हवा :*
 विश्‍वास हा कोणत्याही नात्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरत असतो. जोडीदाराच्या मनात विश्‍वासाची भावना निर्माण करता आली पाहिजे. जोडीदाराला अंधारात ठेवणे, फसविणे तसेच असुरक्षिततेची भावना नात्यांना तडे देत असते. म्हणून विश्‍वास जपता आला पाहिजे.

*२)आदर हवा :*
 नात्यांत एकमेकांप्रती कमालीचा आदर असायला हवा. जोडीदाराचे मत, मनोगत आणि सल्ला याबाबत विचार करायला हवा. दुय्यम वागणूक देणे किंवा जोडीदाराच्या मताचा अनादर करणे हे नातेसंबंधांत योग्य नाही. प्रत्येकाने परस्परांच्या भावनांचा, मनाचा आणि संवादाचा आदर करायला हवा. आदरानेच नात्यांना खरा अर्थ प्राप्त होत असतो.
*३)सहजता हवी :*
 पतिपत्नीचे नाते हे कोणत्याही तत्त्व-नियमांच्या बंधनात अडकलेले नसावे. त्यात्‌ औपचारिकता नसावी. नाते हे सहज असावे. एकमेकांच्या चुका समंजसपणे स्वीकारायला हव्यात. आपणही चुकू शकतो, त्यावेळी आपल्यालाही समोरची व्यक्ती समजून घेऊ शकते हे लक्षात ठेवायला हवे. एकमेकांना कठीण प्रसंगात सावरता यायला हवे. नात्यातील सहजता नात्यांना अधिकाधिक घट्ट करीत असते.

*४)जिव्हाळा हवा :*
 नातं कोणतेही असो त्यात जिव्हाळ्याची व आपुलकीची भावना असायला हवी. प्रेम, काळजी, ममता या गोष्टी जोडीदाराच्या मनात आपल्याबद्दल विश्‍वासाची भावना निर्माण करीत असतात. कुणीतरी आपल्यावर मनापासून प्रेम करते ही भावना नात्यांत गोडवा आणत असते.

*५)तडजोड हवी :*
 संसार करीत असताना आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. अशावेळी दोघांना किंवा दोघांपैकी एकाला तडजोड करावी लागत असते. ही तडजोड करताना इगो, ईर्ष्या, तत्वे आणि संशय या गोष्टी आड येता कामा नये. एकविचाराने, एकदिलाने तडजोड करता आली पाहिजे. वेळप्रसंगी तडजोड करताना दोघांच्या हितासाठी माघारही घेता आली पाहिजे.

*६)नात्यात सुसंवाद हवा :*
 आजकाल मोबाइल हाती आल्यामुळे कुटुंबातील संवाद लोप पावत चालला आहे. सध्याच्या युगात वाढलेल्या अपेक्षा, हेवेदावे, चिडचिड यामुळे सुसंवाद हरवत चालला आहे. पतीपत्नीने आवर्जून एकमेकांशी शेअरिंग करायला हवे. एकमेकांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली पाहिजे.

*७)एकमेकांना वेळ द्या :*
 आजकाल कुटुंबाला प्रगतीकडे नेण्यासाठी जो तो पैसा कमवित असतो. यात काहीही गैर नाही. पती-पत्नीने पैसा कमवावा जरूर परंतु एकमेकांना आणि कुटुंबालाही वेळ द्यावा. वर्तमानाचे सुख, आनंद त्यावेळीच घेता आले पाहिजे. एकमेकांना वेळ दिल्याने एकमेकांप्रती असणारे ऋणानुबंध अधिक दृढ होत जातात.

चला तर मग आज या वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक नवा बदल करूया. पतीपत्नीचे नाते
जन्मोजन्मी अधिकाधिक बहरण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू या."
---------------------------------------

----------------------------------------
*दिनविशेष*
----------------------------------------
*आज संत कबीर ह्यांची जयंती*
----------------------------------------
कबिरांचा जन्म विक्रम संवत १४५५ (इसवी सन १३९८) ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेस, सोमवारी झाला असे मानतात. 

मात्र त्यांच्या मृत्यूसंबंधी पुढील तीन तिथी सांगितल्या जातात : १. माघ शुद्ध ११, संवत्सर १५७५ (इसवी सन १५१८), २. संवत्सर १५५२ (इसवी सन १४९५) आणि ३. मार्गशीर्ष शुद्ध ११, संवत्सर १५०५ (इसवी सन १४४८). 

कबीर हे निर्गुणी भक्तिपरंपरेचे शिखर गाठलेले हिंदी भाषिक थोर संत होत. त्यांनी अवास्तव कर्मकांडावर घणाघाती हल्ला चढवून, ढोंगी लोकांचे बेगडी बुरखे फाडून टाकण्याचे काम केले. 
संत कबीर यांचे जन्मगाव, विवाह, त्यांचे गुरू, आई-वडील, त्यांचे निर्वाण या कोणत्याही बाबतीत अभ्यासकांचे एकमत नाही. गोरखपूरजवळील मगहर हे त्यांचे जन्मगाव मानतात.

कबीरदास भारतातील एक महान कवी आणि समाजसुधारक होते. हिंदी साहित्याचे ते विव्दान होते. कबीर दास या नावाचा अर्थ महानतेशी जोडला गेला आहे ते अर्थातच भारतातील महान कवींपैकी एक होते. जेव्हां कधी भारतातील धर्म, भाषा, संस्कृतीची चर्चा होते त्यावेळी कबीरदासजींचे नाव सर्वात वर घेतले जाते कारण कबीरदासजीं नी आपल्या दोहयांच्या माध्यमातुन भारतिय संस्कृतीचा प्रसार प्रचार केला आहे या व्यतीरीक्त त्यांनी जीवनाशी निगडीत जे उपदेश केले आहेत त्यांना आत्मसात करून आपण आपले जीवन आदर्श बनवु शकतो. 
संत कबीरांनी आपल्या दोहयांच्या माध्यमातुन समाजात पसरलेल्या अंधश्रध्दा, चालिरीतींना, भेदभावाला दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.

संत कबीर हे एक महान कवि आणि समाज सुधारक होते. आपल्या साहित्याव्दारे त्यांनी लोकांना योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली या शिवाय समाजात पसरलेल्या कुप्रथांचा कडाडुन विरोध केला. साध्या राहाणीमानावर त्यांचा विश्वास होता ते अहिंसा, सत्य आणि सदाचारासारख्या गुणांचे पुरस्कर्ते होते. कबीरदासां सारख्या कविने भारतात जन्माला येणे ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.

*संत कबीरदास यांचे योगदान*

कबीरदास यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातुन समाजात पसरेल्या कुप्रथांना चुकीच्या चालिरितींना दुर केले या शिवाय सामाजिक भेदभाव आणि आर्थिक शोषणाचा विरोध केला.

*आज कबीर जयंती निमित्त  काही प्रसिद्ध 'कबीर दोहे' तेही मराठी अर्थासहित :*
 
१.
*बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय,*
*जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय ।*

*अर्थ :* 
जेव्हा मी जगात ‘वाईट’ शोधायला निघालो तेव्हा मला तिळमात्र वाईट दिसलं नाही पण जेव्हा मी माझ्या अंतकरणात डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगात माझ्या पेक्षा कोणीच वाईट नाही.
 
२.
*पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,*
*ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय ।*

*अर्थ :*
 पोथी पुरण वाचून सगळेच काही विद्वान, ज्ञानी झाले नाहीत पण जर प्रेमाचे फक्त अडीच (ढाई) शब्द समजून घेतले म्हणजे प्रेमाचा खरा अर्थ समजून घेतला तर तुम्ही नक्कीच ज्ञानी व्हाल.
 
३.
*साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय,*
*सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय ।*

*अर्थ :*
 जसे धान्यातील खडे, कचरा पाखडण्यासाठी सूप वापरलं जातं तश्याच प्रकारच्या साधू, विद्वानांची गरज आहे जे समाजातील चांगल्या गोष्टीला टिकवून ठेवतील आणि नको असलेल्या गोष्टींना उडवून लावतील.
 
४.
*धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय,*
*माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ।*

*अर्थ :*
 माळीने झाडाला कितीही घडाभर पाणी टाकलं तरी ऋतू आल्यावरच त्याला फळे लागतात तसेच धैर्य ठेवून काम केल्यानेच सर्व काही सिद्धीस जाते असे कबीर म्हणतात.
 
५.
*जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,*
*मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान ।*

*अर्थ :*
 ज्ञानी माणसाच्या जाती पेक्षा त्याचं ज्ञान महत्वाच आहे. यावेळी उपमा देतांना कबीर म्हणतात की तलवारीची किंमत करा त्याच्या म्यानाची नाही.
 
६.
*दोस पराए देखि करि, चला हसन्त हसन्त,*
*अपने याद न आवई, जिनका आदि न अंत।*

*अर्थ :*
 माणसाच्या स्वभावाविषयी बोलताना कबीर म्हणतात की माणूस दुसऱ्यांचे दोष बघता बघता स्वतःचे दोष विसरतो ज्याचा कुठे अंतच नाही.
 
७.
*रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।*
*हीरा जन्म अमोल सा, कोड़ी बदले जाय ।*

*अर्थ :*
 रात्र झोपण्यात घालवली आणि दिवस खाण्यात, मनुष्य जन्म इतका अनमोल होता जो तू असा वाया घालवलास. आयुष्य सार्थकी न लावणाऱ्या जन्माची किंमत (मोल) शेवटी फक्त एका कवडी इतकी राहिली.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
---------------------------------------

------------------------------------------------------------------
*मनाचा संयम*
----------------------
एका शहरात एक विणकर राहत होता. तो स्वभावाने खूप शांत, नम्र, आणि निष्ठावान होता. त्याला कधी राग येत नसे. एकदा काही मुलांनी खट्याळपणाने त्याला त्रास द्यायचे ठरविले. ते सर्व या विचारात गेले की बघू हा चिडत कसं नाही ?

त्यापैकी एक मुलगा श्रीमंत पालकांचा मुलगा होता. तिथे गेल्यावर त्याने विचारले की ही साडी कितीला आहे? विणकर म्हणाला - १० रुपये.

मग मुलाने त्या साडीचे दोन भाग केले आणि म्हणाला की मला ही पूर्ण साडी नकोय मला अर्धीच हवी आहेत ह्याचे किती पैसे घेणार? विणकराने शांतपणे उत्तर दिले ५ रुपये.

त्या मुलाने त्याचे देखील दोन भाग केले आणि त्याची किंमत विचारली ? त्यांनी शांतपणे अडीच रुपये किंमत सांगितली. तो मुलगा तसेच साडीचे तुकडे करत गेला. शेवटी म्हणाला की आता मला ही साडी नको ही माझ्या काहीच कामाची नाही. हे तुकडे मला कसले कामाचे?

विणकराने शांत पणे उत्तर दिले की बाळ ! हे तुकडे आता तर तुझाच काय अजून कोणाच्याही उपयोगी नाही. आता त्या मुलाला लाज वाटली तो म्हणाला की मी आपले नुकसान केले आहे. मी आपल्या त्या साडीची किंमत देतो.

विणकर म्हणाला की जेव्हा आपण साडी घेतलीच नाही तर त्याची किंमत मी आपल्याकडून कशी काय घेऊ ?

त्या मुलाचा स्वाभिमान जागा झाला तो म्हणाला की मी फार श्रीमंत आहे. आपण गरीब आहात मी आपल्याला पैसे दिले तर मला काहीही हरकत नाही. पण आपण हे नुकसान कसं काय सहन कराल? आपले नुकसान मी केले आहेत. तर त्या झालेल्या नुकसानाची भरपाई तर मला करावीच लागणार.

विणकर म्हणाला की त्या झालेल्या नुकसानाची भरपाई आपण करू शकणारच नाही. विचार करा की शेतकऱ्याने यासाठी किती कष्ट घेतले आहेत मग कापूस लावला. माझ्या बायकोने खूप कष्ट घेऊन त्या कापसाला बनवून सूत विणले. मग मी त्याला रंगले आणि विणले. ही केलेली मेहनत त्यावेळी कामी आली असती जेव्हा त्या कापड्याला कोणी घातले असते. पण आपण तर त्या कापड्याचे फार तुकडे केले. आपल्या त्या पैशांनी हे झालेले नुकसान कसं काय भरून निघणार.

विणकराचा आवाज रागाच्या ऐवजी शांतता आणि सौजन्यता होती. त्या मुलाला फार लाजिरवाणी गोष्ट वाटू लागले. त्याचे डोळे पाणावले. तो त्या विणकराच्या पाया पडला. विणकराने त्याचा पाठीवर मायेचा हात फिरवून त्याला आपल्या जवळ घेऊन म्हटले -
बाळ, मी जर का पैसे घेतले असते तर माझे काम झाले असते पण आपल्या आयुष्याचे पण त्या कापड्यासारखेच झाले असते. त्याचा काहीही उपयोग झाला नसता. एक साडी गेली तर मला दुसरी बनवता येऊ शकते पण जर का आपले आयुष्य अहंकाराने नष्ट झाले असते तर परत कसं काय मिळवणार ? आपण केलेले पश्चात्तापच माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

*शिक्षा :*
 संतांच्या उच्च विचारसरणीमुळे मुलाचे आयुष्य बदलले. हे संत अजून कोणी दुसरे नसून संत कबीर दासजी होय.
----------------------------------------

----------------------------------------
 *दिनविशेष*
*५ जून*
----------------------------------------
*आज ‘जागतिक पर्यावरण दिन’*
----------------------------------------
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

*जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण विश्वाने पर्यावरण वाचविण्याबाबत पुढाकार घेणे हा मुख्य उद्देश आजचा या जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागे आहे!*

बदलत्या काळात पर्यावरणात वाढत चाललेला कार्बन डॉयऑक्साईड वायू,पर्यावरण रक्षक ओझोनच्या थराला पडत चाललेली जीवघेणी छिद्रे, रोजची वृक्षतोड वा जंगल सपाटीकरण, पृथ्वीच्या पोटातील संपूष्टात येत असलेली भूजल पातळी आणि या सर्वांमूळे वाढलेले वैश्विक तापमान या बाबी सध्या सर्व जगापुढे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती उभी करत आहेत!
 पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीला मरणाच्या दाराकडे ढकलत नेतोय!
या मागील कारणांचा शोध घेतला असला,
या सर्व पर्यावरण असमतोलाला सर्वस्वी आपण म्हणजे मानवच जबाबदार आहे!
सध्याच्या आधुनिकीकरणाने मानवाचे राहणीमान उंचावले आहे!
मानवी वसतिसाठी जंगलेही तोडली जात आहेत! कारखानदारी व त्यासोबतच पर्यावरणाला हानीकारक ठरणा-या वस्तुंचा वापर (जसे क्लोरो-फ्लोरो-कार्बन अर्थात CFC वायू) वाढला आहे!
मूळातच झाडांची कमी होत असलेली संख्या, वाढते वायूप्रदुषण आणि पर्यावरणाचे व पर्यायाने जीवसृष्टीचे रक्षण करणा-या ओझोन थराला पडलेल्या छिद्रामूळे ग्लोबल वार्मिंग वाढते आहे. ओझोन थरामूळे गाळले अथवा शोषले जाणारे अल्ट्राव्हॉयोलेट किरण, या ओझोन थराला पडलेल्या छिद्राने सरळ जीवसृष्टीवर येवून धडकत आहेत!
घनकच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुराड्यांतून तसेच वाहनांमधून होणा-या वायू उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे, जंगलांचे तसेच सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच जंगलातील व सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी ही हा आजचा दिवस महत्वाचा ठरतो!
या सृष्टीवर सर्वथैव मानवच एक मुख्य कर्ताधर्ता असल्याने हे ओझोन थराचे छिद्र, झाडे लावून व जगवून भरण्याची जबाबदारी फक्त मानवाची आहे!
ज्या भूमातेने आपल्याला जन्म दिला,
जिच्या उदरातच आपली माती होणार आहे, त्या धरतीमातेची काळजी घेणे या बाबतच्या जनजागृतीसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे!
ही धरती माता आपल्याला सदैव देत असते, आपण धरतीला काहीच देत नाही उलट जर धरती माता आपल्याला काही देत असेल तर आपण मूळासकट हिसकवायला बघतो!
नैसर्गिक साधन संपत्ती, मग ती संपत्ती पाणी, खनिज द्रव्ये वा कोणत्याही स्वरुपात असो; आपण धरतीच्या शरीराला खोलवर जखमा करीत ह्या नैसर्गिक साधन धरतीच्या पोटातून काढून घेतो!
या नैसर्गिक साधन संपत्तीच्या रुपातील धरतीचे जणू काळीजच आपण काढून घेतो;

*आजचा दिवस केवळ नावाला साजरा करण्यापेक्षा,*

 पृथ्वीबाबतचा आपलेपणा जागृत करु या!
जगातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याचे केवळ एकच झाड लावून ते जगविले तरीसुद्धा वाढत्या कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजन वायूचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल!
या आजारी धरती मातेच्या अपेक्षाही जास्त नाहीत!
फक्त प्रत्येकाने जीवनात एकतरी झाड लावून त्याचे संगोपन व रक्षण करावे!
या अशा प्रत्येकाने लावलेल्या हिरव्या झाडांचा जेव्हा हिरवा हिरवा शालू आपण या पृथ्वी मातेला पांघरणार, तेव्हाच आपली आजारी पडलेली धरती माता या आजारपणातून खडखडीत बरी होईल;
आणि....,
पुन्हा आपल्या लेकरांच्या सेवेला...
आपली हिरवीगार धरती माता...
नव्या दमाने हजर राहील!
हे सर्व व्हावे असे वाटत असेल तर झाडे लावून जगविणे, धरणे बांधून भूजल पातळी वाढविणे तसेच वायू प्रदुषण, हवा प्रदुषण, मृदा प्रदुषण, जल प्रदुषण व ध्वनी प्रदुषण ही सर्व प्रदुषणे कमी करीत नियंत्रणात आणणे व पर्यावरण समतोल पुन्हा प्रस्थापित करणे हे पर्यावरण व त्यायोगे सृष्टी वाचविण्याचे मुख्य तंत्र आहे!
पर्यावरण हे "पर्याय नसलेले पृथ्वीचे आवरण" आहे!
हे आवरण नैसर्गिकरित्या पुन्हा सृष्टीला परत मिळवून देण्यासाठी आपल्या सृष्टीला पुन्हा हिरवीगार करावी लागणारच आहे!
पृथ्वीचे असे महत्वाचे आवरण वाचविणे हेच आपल्या पर्यावरण दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे!

 _*यामागील मुख्य उद्देश इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.*_ 

--------------------------------------
 *आपण काय करू शकतो* :
----------------------------------------
👉 जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धती साजरा करता येऊ शकतो. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. 
👉 हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्‍या क्लोरे-फ्लुरो कार्बन (CFC) वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. 
👉 घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे. 
---------------------------------------
*
---------------------------------------
 -----------------------------
*पराभूत मानसिकता.* 
--------------------------------
एकदा एका जंगलात एक ऋषी आश्रम उभारून राहत हाेते. त्यांच्याकडे महाकाय हत्ती हाेता. मात्र त्यास एका किरकाेळ दाेरीने बांधून ठेवले जायचे. एक वाटसरू या आश्रमाजवळून जात असताना हे दृश्य पाहून ताे विस्मित झाला. इतका महाकाय हत्ती एका साध्या दाेरीने बांधला गेला आहे आणि याउपरही स्वतंत्र हाेण्यासाठी ताे धडपडत नाही. खरे तर एखादा हत्ती साखळदंडदेखील ताेडू शकताे. त्याच्या मनात जिज्ञासा वाढली की, साधी दाेरी हा महाकाय हत्ती का ताेडू शकत नाही? हा वाटसरू मग ऋषींकडे गेला. त्या वेळी ते शिष्यांना अध्यापन करीत हाेते. वाटसरूने ऋषींना नमस्कार करून आपली जिज्ञासा प्रकट केली.
वाटसरूचा प्रश्न एेकून ऋषी म्हणाले, हा हत्ती जेव्हा खूपच लहान हाेता त्या वेळी माझ्याकडे आला. तेव्हा या साध्या दाेरीने त्याला बांधून ठेवायचाे. त्या वेळी जाेर लावूनदेखील ही दाेरी ताेडणे त्याला कठीण जात असे. तेव्हा हत्तीने ही दाेरी ताेडण्याचा अनेकदा जाेरकस प्रयत्न केले, परंतु अनेकदा ताे जखमी झाला. त्याच्या पायातून रक्त निघाले, परंतु ताे ही दाेरी ताेडू शकला नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर त्याने आपला पराभव मान्य केला आणि नंतर त्याने दाेरीवर जाेर देण्याचेदेखील साेडून दिले. जसा ताे माेठा हाेत राहिला तसा त्याने प्रयत्न केला, परंतु ही दाेरी आपल्याकडून तुटणार नाही असे त्यास वाटायचे आणि दाेरी ताेडण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही. आजही ताे या दाेरीत जखडून राहिला आहे.
खरे तर या हत्तीने पराभव मान्य केला आहे. वस्तुत: काेणत्याही क्षणी ही दाेरी ताेडून ताे स्वत:ला या बंधनातून मुक्त करू शकताे, परंतु बालपणीच्या पराभवाला आयुष्यभराचा पराभव मानून त्याने पुन्हा प्रयत्न करण्याचे साेडूनच दिले. या महाकाय हत्तीप्रमाणे आपल्या आसपास असे कितीतरी लाेक आहेत, जे स्वत:ला कमनशिबी म्हणवून घेतात, आयुष्यात कधीही यशस्वी बनू शकत नाही या भ्रमाला कवटाळून राहतात. कारण त्यांनी अगाेदर खूप प्रयत्न केलेले असतात, परंतु ते सारे प्रयत्न असफल ठरलेले असतात.

*शिकवण :*
 एखाद्या कामात अपयश आल्यानंतर ते अशक्य आहे, असे गृहीत धरून दुसऱ्यांदा त्याच्या मुळाशी आपण हात घालत नाहीत असे आपल्या आयुष्यात अनेकदा घडते. खरे तर आपल्या कार्यशैलीतील काही त्रुटी किंवा अन्य काही कारणे त्यामागे असू शकतात.
----------------------------------------
*
---------------------------------------
🙏🌹🤝🦚🕉️☯️🛐🦚🤝🌹🙏

Comments