Ganesh visarjan

🤔 *गणेश विसर्जन; आपण काय करू शकतो?*

* Special*
 
आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस. सगळीकडे उत्साहात बाप्पाला निरोप दिला जाईल. मात्र या उत्सवाचे मांगल्य टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आज याबाबत थोडा विचार करूया..

*1.* गणेशोत्सवात एक तर प्लास्टिकचा वापर नकोच. मात्र, जर होत असेल तर विसर्जनावेळी झालेली सर्व घाण ही साफ केलीच पाहिजे, तसेच प्लास्टिक नदीत जाणार नाही याची काळजीदेखील घेतली पाहिजे.

*2.* विसर्जना दरम्यान मोठ्या प्रमाणावर हार, दूर्वा, फुले अनेक ठिकाणी पडलेले असतात. या सर्व गोष्टी या आपण निर्माल्य कलशात टाकायला हव्यात. यामुळे स्वच्छता व भावना दोन्हींचा सन्मान होईल.

*3.* आपल्याकडे गोळा होणारे निर्माल्य खरे तर ओला कचराच असतो. तो जिरवताही येईल. फुले, दूर्वा, पाने यांसारख्या गोष्टींचे खत करून दुसऱ्या झाडांसाठी वापरता येईल.

*4.* विसर्जनाच्या ठिकाणी नागरिकांच्या सहकार्याची खूपच आवश्यकता असते. कारण यावेळी नको त्या गोष्टी पाण्यात टाकल्यास पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे आपण हे टाळायला हवे.

*5.* कोणत्याही परिस्थितीत निर्माल्य तलावात किंवा नदीत टाकू नये. कारण यामुळे पर्यावरणाची होणारी हानी टळेल.

*6.* वाहनांमुळे आणि हवेमुळे गुलालाचे कण वातावरणात पसरतात. यामुळे श्वसनाद्वारे शरीरात जाऊ शकतात जे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे चेहऱ्याला रुमाल बांधून फिरले तर उत्तम.

*7.* नागरिकांनी विसर्जन मिरवणुकीत आपल्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल सांभाळावेत. तसेच, संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने त्याची माहिती पोलिसांना द्यावी.

*8.* मिरवणुकीला जाताना पाकिटात जास्त रक्कम, डेबिट व क्रेडिट कार्ड ठेवू नका. तसेच शर्टच्यावरील खिशामध्ये मोबाईल ठेवू नका.

चला तर आज बाप्पाला उत्साहात निरोप देऊया. उत्सवाला माझ्याकडून कोणतेही गालबोट लागू देणार नाही हा विचार करूया आणि शेवटी म्हणूया "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..."        

📚 

Comments