जपमाळ
जपमाळ माहिती
==========
जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा.
डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये.
नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये.
माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये.
जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी.
जप करण्याची पद्धत
—————————
शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा.
गोमुखीने केलेला जप :
उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ठ बाधांपासून मुक्ती मिळते.
अंगठयाच्या सहाय्याने जप : मोक्ष प्राप्ती होते.
तर्जनीने जप : शत्रुनाश होतो.
मध्यमेने जप : धनप्राप्ती होते.
अनामिकेने जप : शांतीप्राप्त होते.
करांगुलीने जप : सुंदरताप्राप्ती होते.
जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये, जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरूमण्याकडे यावे.
जपाची शास्त्रीय पद्धत :
मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठयाने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे , या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठमध्यमायोगात्सर्व सिद्धी प्रदासने। (मंत्रमहार्णव) अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्वसिद्धी प्राप्त होतात.
जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघडया जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी.
जपमाळेतील १०८ मणी :
विद्युत शास्त्रात १०८ या अंकाचा खुलासा मिळतो. १०८ हा एक स्थिरांक उल्ल२३ंल्ल३ आहे. द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युतशक्ती उपयोगात येते, त्या विद्युतशक्तीचे हे माप आहे. या मापाला फॅरडे म्हणतात.
[FARADAY (फॅरडे) Rcharge carried by one gram equivalent of an ion, i.e. charge required to pass to liberate १०७.८८= (१०८). gm of silver is called as ONE FARADAY.]
धर्मशास्त्रानुसार :
जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये १०८ मणी असतात. माळेमध्ये १०८ मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते.
देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही.
रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतिक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक उर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहचवतो.
शास्त्रामध्ये सांगितले आहे की…
|| बिना दमैश्चयकृत्यं सच्चदानं विनोदकम् |
असंख्यता तु यजप्तं तत्सर्व निष्फलं भवेत् ||
अर्थ :
देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचे आहे, त्यानंतर दान-पुण्य आवश्यक आहे. याचप्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो.
माळेमध्ये फक्त १०८ मणी का असतात ? ह्याची वेगवेगळी कारणे….
१) शास्त्रामध्ये सांगितले आहे की :
|| षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकं विशांति |
एतत् संख्यान्तितं मंत्रं जीवो जपति सर्वदा ||
या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो, त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या १०८ चा संबंध आहे.
सामान्यतः २४ तासांमध्ये व्यक्ती २१६०० वेळेस श्वास घेतो. दिवसातील २४ तासांमधील १२ तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक १२ तासांमध्ये व्यक्त १०८०० वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी-देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या १२ तासांमध्ये १०८०० वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी १०८०० वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी १०८ संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये १०८ मणी असतात.
आणखी एका मान्यतेनुसार :
माळेमधील १०८ मणी आणि सूर्याच्या कलांचा संबंध आहे. एक वर्षामध्ये सूर्य २१६०० कला बदलतो. सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो. सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन. अशाप्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये १०८०० वेळेस कला बदलतो. याच १०८०० संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये १०८ मण्यांची संख्या निश्चित केली आहे.
माळेचा एक- एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतिक आहे. सूर्य एकमात्र साक्षात दिसणारी देवता आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार :
ब्रह्मांडाला १२ भागांमध्ये विभाजित केले गेले आहे. या १२ भागांचे नाव मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत. या १२ राशींमध्ये नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू संचरण करतात. या ९ ग्रहांच्या संख्येचा गुणाकार १२ राशींशी केला तर १०८ संख्या प्राप्त होते. माळेमधील मोत्यांची १०८ संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते.
आणखी एका मान्यतेनुसार :
ऋषीमुनींनी माळेमध्ये १०८ मणी ठेवण्याच्या मागे ज्योतीषीय कारण सांगितले आहे.
शास्त्रानुसार एकूण २७ नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि २७ नक्षत्रांचे एकूण १०८ चरण
असतात. माळेचा एक-एक मोती नक्षत्राचा एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो.

Comments
Post a Comment