💁‍♂ *फळबागांमध्ये घेता येणारी आंतरपिके*

*LetsUp | Agri*

फळबागांमध्ये आंतरपिके घेऊन तुम्ही आर्थिक कमाई तसेच जमिनीत आवश्यक सुधारणा घडवून आणू शकता. चला तर आज जाणून घेऊयात फळबागांमध्ये घेता येणारी आंतरपिके आणि आणि त्याचे फायदे...

केळी, पपई, अननस यांसारख्या काही फळबागा 2 ते 3 वर्षे टिकणाऱ्या असतात. यांचे लागवड अंतर कमी असते. यामध्ये पहिल्या वर्षी काही हंगामी भाजीपाला पिकांचे आंतरपीक फायदेशीर ठरते.

संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू, अंजीर अशा बागांतून आंतरपिके घेण्यामुळे अधिक फायदा होतो. या फळबागा 10 वर्षांपेक्षा अधिक टिकतात. त्यांचे उत्पादनही 25-30 वर्षांपर्यंत मिळत राहते. मात्र द्राक्ष, चिकू, नारळ, सीताफळ, काजू या फळबागांमध्ये आंतरपिके घेताना अधिक विचार करावा लागतो.

🎯 *आंतरपिके घेण्याचे फायदे* :

▪ आंतरपिकाचा लाभ मुख्य फळपिकांसाठीही करून घेता येतो.
▪ आंतरपीक लागवडीमुळे जमिनीची उत्तम मशागत देखील होते.
▪ आंतरपिकाच्या लागवडीमुळे जमिनीत आवश्यक सुधारणा घडवून आणता येते.
▪ मुख्य फळबागेचे उत्पादन सुरू होईपर्यंतच्या काळात आंतरपिकांपासून आर्थिक कमाई करता येते.
▪ उपलब्ध साधन सामग्रीचा आणि मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करता येतो.
▪ उपलब्ध जमीन आणि पाणी यांचा पुरेपूर मोबदला घेता येतो.

🧐 *आंतरपिके निवडताना घ्यावयाची काळजी* :

▪  आंतरपीक हे मुख्य पिकास पूरक असे असावे.
▪  फळबागेची जमीन सुधारेल असे आंतरपीक असावे.
▪  आंतरपीक हंगामी आणि कमी कालावधीत तयार होणारे असावे.
▪ आंतरपिक हे मुख्य पिकावर कीड-रोग यांचा प्रादुर्भाव होणारे नसावे.
▪ त्याची वाढ आणि विस्तार मुख्य फळपिकांना झाकून टाकणारा अगर अडथळा आणणारा नसावा.

👍 *कमी कालावधीच्या फळपिकांचे आंतरपीक* :

▪ डाळिंबामध्ये कोबी, प्लॉवर
▪ काकडीमध्ये मिरची
▪ तोंडलीत मिरची
▪ केळी : फुलकोबी, खरबूज
▪ डाळिंब, पेरू, चिकू, आंबा, सीताफळ : शेवगा, पपई

🌐 

Comments