सुपारी लागवड
👨🌾 *सुपारी लागवड कशी करावी?* :
*LetsUp | Agri*
सुपारीला उष्ण व दमट हवा लागते. सुपारीमध्ये प्रामुख्याने दोन जाती आहेत पांढरी सुपारी आणि लाल सुपारी. समुद्रकिनाऱ्यापासून फार लांब अंतरावर सुपारी होत नाही. तसेच डोंगरी बागायती जमीनींत सुपारी लागवड करतात व तिच्या पद्धती भिन्न-भिन्न आहेत.
1) पांढऱ्या सुपारीच्या जाती : गोवी, मंगळुरी, रूपसई, कलकत्ता, असिग्री, शिरसी, श्रीवर्धनी.
2) लाल सुपारीच्या जाती : मलबारी, कुमठा, मुरारकडी, गोवा, वसई, सेपळी, मालवणी, वेंगुर्ला, कलकत्ता.
🤔 *कशी कराल लागवड?* :
सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी. या जातीची सुपारी मोठी व मऊ असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त आहे. आकार आकर्षक असल्याने या सुपारीला दरही चांगला मिळतो.
योग्य वाढ झालेल्या झाडापासून सोललेल्या सुपारीचे दोन कि.ग्रॅ. उत्पादन मिळते. लागवड करताना जमिनीवरील झुडपे तोडून जमीन सपाट करावी. वाऱ्यापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी सुरूची रोपे बागेभोवती लावावीत.
लागवड करण्यासाठी 2.7 x 2.7 मीटर अंतरावर 60 सें.मी. x 60 सें.मी. x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. त्यामध्ये पालापाचोळा, दोन पाटी चांगले कुजलेले शेणखत, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 60 ग्रॅम कार्बारिल भुकटी (पाच टक्के) चांगल्या मातीमध्ये मिसळून खड्डा भरून घ्यावा.
लागवडीसाठी रोपांची निवड करताना जाड बुंध्याची, कमी उंचीची, जास्त पाने असलेली जोमदार, 12 ते 18 महिने वयाची रोपे निवडावीत. रोपांना कमीत-कमी चार ते पाच पाने असावीत. उंच व लांब पानांची रोपे लागवडीसाठी निवडू नयेत. लागवड जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करावी. रोपांची चांगली वाढ होईपर्यंत रोपांचे पावसापासून संरक्षण करावे.
🌐

Comments
Post a Comment