माझ्या प्रेमाचं प्रगती पुस्तक
माझ्या प्रेमाचं विकासाचं प्रगती पुस्तक ा
पडलो जिच्या प्रेमात ती दिसत नाही आशात ,
शेवटचं भेटलो तेव्हा तीने दिले होते एक गुलाबी रंगाचं पत्र, खुश होऊन ते पत्र तसचं ठेवल होत कपाटात.
बर्याच दिवसांनी कपाट आवरताना
ते मला दिसलं.
पाहूया आहे तरी काय सांगतेस माझ्या बद्दल; त्यात लिहिलं होतं एक आराखडा व होते काही गुण. माझ्या गुणात आहे नुसतेच भोपळे, केले होते मला तिच्या प्रेमाच्या प्रगती पुस्तकात अनुत्तीर्ण,
मी झालो माझ्याच मनातल्या प्रश्नांना अनुत्तरीत ? हा विकास✍
नंतर,
आज ती पुन्हा एकदा दिसली, डोक्यात माझ्या मनात जोरदार घंटा वाजली.
तसाच मी गेलो तीच्या कडे, तीला काही बोलणार इतक्यात लहान मुले तीथे आली, ती म्हणाली "कोणता हा मामा गडे ? " आता ती अनुत्तरीत ?
हाच माझा विकास✍
ती म्हणाली, "खरच तुमचा हा मामा .आता पुन्हा सांगते यांचे नाव तुमच्या बाबांना." असे त्यांना सांगून ती मला बोलली, "तुमच्या घरचा पत्ता द्या. " परत अनुत्तरीत
घाबरलेला विकास✍
पत्ता शोधत आले त्या मुलांचे बाबा.तो म्हणाला, "तुच का तो तीच्या कडे बघतो, सोड आता ती च्या कडे अस पाहन. ये उद्या आमच्याकडे तुला जरा बोलायचय . आला नाहीस तर ? आता तो अनुत्तरीत पण आत
भिलेला विकास✍
भीत भीत मी गेलो त्यांच्या घरी. बाहेरच खेळत होती ती मुलं, पाहिल्यावर मला गर्दा करीत मामा~ मामा म्हणून जवळ आली. सवयी प्रमाणे मी त्यांना दिली चॉकलेट, ते बघून आली त्यांची तीन कुत्री धावत माझ्या कडे आणि मी ही लागलो बाहेर पळायला. तेवढ्यात कोणी तरी म्हटले ," जातो आहेस कुठे ?" मी पळत अनुत्तरीत
भित्रा विकास ✍
पळता पळता समोरुन आले मुलांचे बाबा आणि मला परत एकदा घेऊन गेले त्यांच्या घराच्या मध्ये. तीथे एक वृद्ध व्यक्ती मला म्हणाले , "आहो ते आले होते प्रेमाने जवळ तुमच्या. बरं तुमचे नाव, गाव , गोत्र काय आहे ?"
मी पटकन सांगितले. पुन्हा विचारलं, "पोटापाण्यासाठी काम धंदा आहे काय?" आता सांगू काय, अनुत्तरीत
बिनकामी विकास✍
तेवढ्यात तीथे आल्या काही जनी चहा, पोहे ,शिरा, पाणी घेऊन.
अरे! त्यात ती पण होती. तीला मी बघुन झालो सुन्न .कोण काय म्हणाले ते काही कळले नाही.
खाणं झाल्यावर ते म्हणाले, "कशी काय वाटली आमची मुलगी?"
मला तीच्या शिवाय कोणीच दुसरे दिसत नव्हतं , ते परत म्हटले ,
"परत तिकडेच काय पहाताय ? ईकडे पहा आहे का पसंत?"
त्यांची मुलगी कोणती? अनुत्तरीतच
गोंधळलेला विकास✍
तिच्या समोर तिच्या घरच्यांना नाही कसे काय म्हणायचे म्हणून मी त्यांना सांगितले,
" पसंत आहे तुमची मुलगी. "
लग्नाची बोलणी झाल्यावर पुन्हा ती मुले आली आणि म्हणाली,"तुम्हीच होणार ना आमचे मामा? " त्यांना तरी काय सांगू माझी व्यथा. व्यथित अनुत्तरीत
काहीसा हसरा पण मनाने निराश विकास✍
लग्नाचा बस्ता घेतांना तीही आली, पण माझ्या पासून दूर दूर राहू लागली.
संपुर्ण कपडे घेवुन झाल्यावर ती जवळ येऊन मला म्हणाली, "आवडले का कपडे लग्नाचे? " कधीच नाही घेतले कपडेही मी माझ्या आवडीने आता माझी पसंती पण नाही माझ्या मर्जीने. अनुत्तरीतच
नावडता विकास✍
लग्नाच्या दिवशी मी तयार झालो तिच्या साठी, पण ती काही दिसत नव्हती कोणत्याही कामासाठी.
कान पिळवणूकीला आले मुलांचे बाबा आणि आणि म्हणाले, "आता माझ्या बहिणी कडेच पहा ,दुसरी कडे नाही. "
लग्न झाल्यावर ,पावठणीला पण नाही दिसली .
आता कोणाला विचारु होती त्यांची ती कोण? अजूनही अनुत्तरीतच.
बायकोच्या पठवणीला रडनाला विकास✍
घरी आल्यावर आम्ही,
लग्नाचे फोटो, व्हिडिओ माझ्या मोबाईलवरचे पाहतांना .तेवढ्यात आली माझी बायको.आणि म्हणाली "हे घ्या चहा , जरा इकडे तरी पहा. "
मी पहिल्यांदाच तीला पाहिले. मला तीच दिसते.
ती म्हणाली, "ओळखले नाही.मी सांगितले होते माझ्या भाच्यांना .आणि तसेच झाले. "
आशी मिळाली माझ्या मित्राला त्याची ती
आता सर्व काही उत्तरीत.
फक्त पाठवणारा विकास✍
Vikas
ReplyDeletevery nice