आई-बाबा मला याची कल्पना आली असती तर......

*आई-बाबा मला याची कल्पना असती तर.....* 

 आई तुझं काम कमी करण्यासाठीच मी शिकत होतो स्वयंपाक तुझ्या कडून  .
मला फक्त द्यायचा होता आराम तुला कामातून.
 पण हे तु आधीच जाणलं होतं की , भविष्यात काय वाढून ठेवलंय माझ्या समोर .
म्हणून तु शिकवलं या आळशी मुलाला घर आवरण्याच्या पासून ते घर सांभाळायला तुझ्याच समोर .
आई जर मला याची कल्पना आली असती तर.....
आई नको गं ! तुझी करायला मदत , मला  फक्त हवी आहेस आई तुच तर .
आई अजून ही सैरभैर भटकत असतो मी तर .
आई हे सर्व जाणून ही जड अंतःकरणाने शेवट पर्यंत साथ दिली मला प्रसन्न मुखाने तु तर.
आई खरंच मला याची कल्पना असती तर...

बाबा सहज एकदा करण्यासाठी मदत तुमची लिहून ठेवला तुम्ही दिलेल्या पैस्याचा हिशोब.
 मला कळलेच नाही होईल तो तंतोतंत तुमच्या सारखा हिशोब.
बाबा पाहून हा हिशोब तुम्ही करायला लावला शेतीचा ही हिशोब.
बाबा झाले आता रोजचेच प्रयोजन तुमचे तर .
"विकास झाला का आजचा हिशोब लिहून ?  विसर पडेल उद्या कंटाळा आला तर."
बाबा तुम्हाला होती माहिती भविष्याची.
तुम्हाला कळकळ माझ्या भविष्याच्या विकासाची.
बाबा जर मला याची कल्पना आली असती तर ‌.‌..
बाबा नाही करायचा तो जमा खर्च  मला , तुमच्या वर सारं हिशोब खर्च बाबा माझा तर.
बाबा अजून ही मन चंचल फिरतं माझं तर.
बाबा ऐव्हंढ्या वेदना असुन ही शेवट पर्यंत "काही नाही बरं वाटतं." म्हणत होतात तुम्ही तर.
बाबा खरंच मला याची कल्पना असती तर....

Comments