🌱 *सोयाबीन पिकातील कीड नियंत्रण*

*LetsUp । Agri*

💁‍♂ सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन जागतिक स्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते.या पिकातील विविध किडींची ओळख व त्यावर नियंत्रण कशाप्रकारे करावे हे आपण जाणून घेऊया.

🎯 *व्यवस्थापन* :
▪ पेरणी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात संपवावी.
▪ पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण शिफाराशीप्रमाणे वापरावे.
▪ नत्रयुक्त खतांचा समतोल वापर करावा.
▪ पिकाच्या सुरुवातीच्या काळात पिक तणमुक्त ठेवावे तसेच बांधावर असणाऱ्या किडींच्या पूरक खाद्य वनस्पतीचा नाश करावा.
▪ पिकाच्याभोवती सापाला पिक म्हणून एरंडीची एक ओळ लावावी आणी त्यावरील तंबाखूची पाने खाणारी अळी आणी केसाळ अळी यांची अंडीपुंज वेळेत नष्ट करावीत.
▪ पिकात हेक्टरी 20 ते 25 पक्षीथांबे उभारावेत.
▪ तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीसाठी हेक्टरी 10-12 कामगंध सापळे लावावेत.
▪ पाने खाणाऱ्या अळ्या, खोडमाशी, चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच 5% निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.
▪ केसाळ अळी तसेच तंबाखूची पाने खाणारी अळी पुंजक्यामध्ये अंडी घालतात व त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या सुरुवातील एकाच पानावर बहुसंख्य असतात, अशी अंडी व अळ्या पाने अलगत तोडून किडीसह नष्ट करावीत.
▪ पिकांची नियमित पाहणी करून किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.
▪ तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एस. एल. एन. पी. व्ही. 500 एल. ई. विषाणू 2 मी. ली. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरीया रीलाई या बुरशीची 4 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव दिसताच फवारणी करावी.
▪ हिरव्या घाटे अळीकरिता हेक्टरी किमान 5-10 कामगंध सापळे शेतात लावावेत. सापळ्यामध्ये प्रती दिन 8 ते 10 पतंग सतत 2-3 दिवस आढळल्यास नियंत्रणाचे उपाययोजना करावी.
▪ सोयाबीन नंतर भुईमुंगाचे पिक घेऊ नये.
▪ किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास किटकनाशकाची फवारणी करावी.

🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा :* https://bit.ly/2NaKm2C

Comments