Posts

Showing posts from December, 2020

#bye bye 2020 year#Welcome 2021 year.#Corona years 2020 खुप काही शिकवून ...

श्री दत्तजन्माख्यान व श्री दत्त आरती

आयुष्यात गुरू ची गरज ओळखा #गुरुच्या संगतीत का राहावं #आईबाबा आपले पहिले ...

श्री दत्त जयंती निमित्त 20/12/2017रोजी निघालेली शोभायात्रा . #श्री दत्तध...

!! ॐ श्रीम् नमः !! श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा!!श्री महालक्ष्मी माहात्म्य!! (मार्गशीर्ष गुरुवारची व्रत कथा)

**व्यवसाया संदर्भात मार्गदर्शन राशीनुसार** प्रत्येक व्यक्तीला आपण कोणता व्यवसाय करावा कोणता धंदा करावा कशा प्रकारची कारखानदारी करावी कोणता व्यवसाय सुरू करावा म्हणजे त्यात यश मिळेल सफलता मिळेल असा प्रश्न असतो कारण जर चुकीचा व्यवसाय सुरू झाला तर त्यात नुकसान होण्याची शक्यता असते पत्रिकेतील ग्रहांच्या मुळे आपल्याला कोणता व्यवसाय करावा यासंदर्भातील योग्य मार्गदर्शन मिळू शकते आपण आता ढोबळ मानाने राशीचा व्यवसायावर काय परिणाम होतो ते पाहू किंवा कोणती रास कोणत्या कोणत्या व्यवसायातून यश मिळू शकते ते पाहू आपण सर्व राशींचे. मेष रास मेष राशीच्या व्यक्तींच्याकडे धडाडी असते धाडस असते आत्मविश्वास असतो अखंड जागरूक राहतात चर रास असल्यामुळे वेगाने काम करतात चिकाटीने काम करतात व कोणत्याही धाडसाचासाठी तत्पर असतात त्यामुळे मेष राशीतील ग्रहांचा दहाव्या स्थानाशी संबंध आला तर ते चांगले ठरते मेष ही चर रास आहे तेव्हा अशा व्यक्ती सरळ चाकोरीतून न जाता कसल्याही अडचणीच्या प्रसंगाला तोंड देऊन नवीन वाट शोधतात व मोठ-मोठी कामे पार पडतात मेष राशीमध्ये गुरु, रवि ,मंगळ हे ग्रह बलवान ठरतात. मेष राशीसाठी डॉक्टर ,केमिस्ट्री ,औषधे ,लोखंड, पोलाद या सर्वात व्यवसाय साठी एक वेगळीच ऊर्जा ताकत लागते ती या राशीकडे आहे तसेच दारू, कोकम, भांग ,गांजा ,अशा मादक पदार्थाचा व सर्व यंत्रे सर्व कारखाने , पोलादाचे कारखाने या सर्वांसाठी धाडस लागते ते धाडस मेष राशीच्या व्यक्तीकडे आहे वृषभ रास ही स्थिर रास आहे यामुळे वृषभ राशीच्या व्यक्ती शांतपणे आज्ञाधारक पणे आपले काम करत असतात शक्यतो चांगल्या व्यक्तीच्या हाताखाली काम करण्यात त्यांना आनंद मिळतो वृषभ राशीच्या व्यक्ती या अधिक करून सेवा वृत्तीने काम करतात त्यांना चांगल्या कर्तबगार यशस्वी पुरुषांच्या हाताखाली काम करणे आवडते वृषभ राशीला स्थलांतर आवडत नाही सुरुवातीला व्यवसायात जे गाव डनिवडतील तेथेच राहतात अधिक पगाराची अपेक्षा न करता आहे त्या ठिकाणी संपुष्ट राहून काम करणाऱ्या वृषभ व्यक्ती असतात वृषभ राशीचे किंवा लग्नाच्या व्यक्ती नोकरीसाठी मिळणे हे चांगले असते. वृषभ राशीसाठी व्यवसाय सर्व कला संगीत नाट्य चित्रपट रंगभूमी शिल्पकला चित्रकार गायन-वादन सर्व वाद्य थेटर अभिनय कला या सर्वांत वृषभ राशि दिसून येतील तसेच साडी सेंटर कॅटिरिंग ज्वेलर्स सोन्या-चांदीचे दागिने मेवामिठाई सुगंधी द्रव्य अत्तरे हिरे माणिके सर्व प्रकारचे रियर डेकोरेशन सर्व प्रकारच्या किमती वस्तू कलाकुसरीच्या वस्तू पेंटिंग सर्व खाद्यपदार्थ बिस्किटे मेवामिठाई पाव खारी बिस्किटे सर्व खानावळ हॉटेल स्त्रियांकरिता वस्तीग्रह सर्व स्त्रियांच्या संस्था या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्ती वृषभ राशीच्या दिसून येतील. मिथुन राशी ही बुधाच्या अंमलाखालील रास आहे शिक्षक ,प्राध्यापक, अकाउंटिंग, कारकून ,बँकिंग ,वृत्तपत्र, कायदा, प्रवचनकार ,छापखाना, बुद्धीच्या संदर्भातील, ज्ञानाच्या संदर्भातील, लेखनाच्यासंदर्भातील व शिकवणीच्या संदर्भातील मिथुन रास बलवान असते मिथुन राशीकडे हजरजबाबीपणा असतो, प्रसंगावधान असते, विनोदी बुद्धी असते, मात्र मिथुन राशीच्या व्यक्ती मेष राशी प्रमाणे पुढाकार घेऊन व्यवसाय काढणार नाहीत ज्या ठिकाणी त्यांचे मन रमत नाही त्यांच्या मनासारखी नोकरी नाही अशा ठिकाणी मिथुन राशीच्या व्यक्ती थांबणार नाहीत संपादक, वृत्तपत्र, बँकींग ,अकाऊंट ,हिशोब, त्याचप्रमाणे ग्रंथप्रकाशन ,प्रकाशन व्यवसाय, वृत्तपत्रे, दैनिके ,आकाशवाणी ,दूरदर्शन याठिकाणी त्यांच्या ज्ञानाचा बुद्धीचा फायदा होतो मिथुन राशीच्या व्यक्ती बऱ्याच वेळा अस्थिर व चंचल स्वभावाच्या असतात एक ना धड भाराभर चिंध्या अशी काही वेळा त्यांची अवस्था असते. कर्क रास ही एक समाज प्रिय रास आहे ही चर रास आहे कर्क राशीच्या व्यक्तीने मोठ्याप्रमाणावर लोकप्रियता मिळते कर्क राशीच्या व्यक्ती एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या पक्षामध्ये पुढाकार घेतात त्यांच्याकडे एक प्रकारचे चुंबकत्व असते त्यामुळे त्यांच्याकडे अनेक लोक आकर्षित होतात आपल्या देशामध्ये नेतृत्व केलेल्या अनेक व्यक्ती कर्क लग्नाच्या किंवा कर्क राशीच्या आहेत महात्मा गांधी ,पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, यांची कर्क रास होती लता मंगेशकर व गायक किशोर कुमार या सर्व कर्क राशीच्या व्यक्ती आहे कर्क रास ही संवेदनशील रास आहे कर्क राशीच्या व्यक्तींना समाजाची सहानुभूती लाभते कर्क राशीच्या व्यक्ती पुढे येणे हे बरेच गुरु, रवि-मंगळ अश्या बलवान ग्रह बरोबर शुभ संबंध असतील तर कर्क राशीच्या व्यक्ती पुढे येतात. सर्वसामान्यपणे वाहतूक, पेये, सर्व द्रव्य पदार्थ ,भाजीपाला, फळावर, रस खाद्यवस्तू, चांदी, हॉटेल ,खानावळी, रेल्वे ,गाड्या, वाहने, मोटारी, सर्व वाहतुकीची साधने ,जहाजे ,विमाने, सर्वप्रकारचे प्रवास, सर्व मनोरंजनाची क्षेत्रे याच्यावर कर्क राशीचा अंमल आहे. सिंह ही राज राशी आहे त्यामुळे सुरुवातीला व्यक्ती कितीही सामान्य असली तरी ती आपल्या नशिबाच्या जोरावर पुढे येते अगदी सुरुवातीला एकदम सामान्य पातळीवर असलेल्या व्यक्ती अद्‍भुतपणे पुढे येतात सिंह रास ही राजाची ,नेत्याची व अधिकाऱ्याची रास आहे सिंह राशीला लोकांच्यावर हुकूमत गाजवने आवडते सिंह राशीच्या व्यक्तींच्या कडे अधिकाऱ्याची लालसा असते त्यांना सत्ता हवी असते त्यांना नेतृत्व करणे आवडते शासकीय क्षेत्रात, उच्च अधिकारी, मॅनेजर, वेगवेगळ्या कंपनीमध्ये चेअरमन, संचालक, हे सिंह राशीच्या व्यक्ती असतात लोकांच्यावर हुकूमत गाजवने त्यांना आवडते सिंह रास ही स्थिर रास आहे त्यामुळे शक्यतो आपल्या गावात किंवा ज्या ठिकाणी ते काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांना काम करणे आवडते मेष, कर्क, तूळ व मकर या राशी प्रमाणे सिंह राशीच्या व्यक्ती आपल्या जीवनात वरचेवर बदल करत नाहीत सढळ हाताने खर्च करण्यात दानधर्म करण्यात व दानशूर म्हणून सिंह व्यक्ती प्रसिद्ध असतात शासकीय अधिकारी म्हणून सिंह राशीच्या व्यक्ती यशस्वी होतात सरकारी नोकरी वरिष्ठांचे सल्लागार मोठमोठे कारखाने दार उत्तम दर्जा असलेली संस्था सोने सोन्याचे दागिने सट्टे व्यापाऱ्याच्या, राजकारण या सर्वांवर सिंह राशीच्या व्यक्ती आढळून येतील कन्या ही द्विस्वभाव रास आहे. जगात यशस्वी होण्याकरिता वेळेवर निर्णय घ्यावे लागतात. योग्य वेळी निर्णय घेऊन तडपणे काम करावे लागते. मात्र, कन्या रास ही द्विस्वभावी असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींचे झटपट निर्णय होत नाहीत. कन्या रास ही धडाडीने स्वतःचा व्यवसाय काढणारी नव्हे. वृषभ राशी प्रमाणे या ही लोकांना नोकरी करण्यात आनंद मानते. मात्र, यांच्याकडे चिकित्सक बुद्धी फार असते. तसेच कोणत्याही एका गोष्टीवर, एका व्यक्तीवर, एका विषयावर यांची श्रद्धा नसते. काहीवेळा आत्मविश्वासाचा अभाव असतो .मात्र, तीव्र स्मणशक्ती ,उत्तम बुद्धिमत्ता, असामान्य ग्रहणशक्ती यामुळे कन्या राशीच्या व्यक्ती या शाळा, कॉलेज ,शिक्षण संस्था, वृत्तपत्रे, कायदा, यामध्ये तसेच अकाउंटन्सी या विषयांमध्ये यशस्वी होतात मोठ मोठ्या लोकांचे चिटणीस म्हणून ,सेक्रेटरी म्हणून ते काम करतात. अनेक भाषेचे ज्ञान त्यांना असते .त्यांच्याकडे स्मणशक्ती चांगली असल्यामुळे अनेक विषयाची माहिती त्यांच्या जिभेवर असते. बँकिंग, विमा, ज्योतिष, शिक्षक, प्राध्यापक, प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते, प्रकाशक, लेखक, साहित्यिक, संपादक, याठिकाणी कन्या राशीच्या व्यक्ती आढळतील. तुळ रास ही चर रास आहे त्यामुळे मेष, कर्क व मकर या राशी प्रमाणे तूळ राशीच्या व्यक्तीच्या जीवनात पुढे येतात. ज्या ठिकाणी मेहनतीची कामे नाहीत. शारीरिक त्रास नाही. अशा ठिकाणी तुळ राशीच्या व्यक्ती काम करतात. तडजोड करून विचारांची देवाणघेवाण करून, मिळते-जुळते घेऊन तूळ राशीच्या व्यक्ती काम करतात. आपल्या देशामध्ये अनेक नेते हे तूळ राशीचे आहेत किंवा लग्नाचे आहेत. समाजावर मनापासून प्रेम करणारे, मानवतेचे कल्याण करणारे, सुसंस्कृत, सुस्वभावी अशा तूळ राशीच्या व्यक्ती असतात. त्यामुळे ते अनेक व्यवसायात गती मानाने परिश्रम करून पुढे येतात. सर्व कला, संगीत, नाट्य, चित्रपट, रंगभूमी, शिल्पकला, चित्रकार ,गायक ,वादन, सर्व वाद्ये, अभिनय कला या सर्वांमध्ये तूळ राशीच्या व्यक्ती दिसतील. तसेच साडी सेंटर, ज्वेलर्स, सोन्या-चांदीचे व्यापारी, सर्व खाद्यपदार्थ बनवणारे, खानावळ हॉटेल याही सर्व ठिकाणी तूळ राशीच्या व्यक्ती आढळतील. वृश्चिक रास ही स्थिर रास आहे .परंतु वृश्चिक राशीकडे महत्त्वाचा गुण म्हणजे निर्धार, निश्‍चय, कणखरपणा, चिकाटी, प्रयत्नमधील सातत्य. यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्ती या स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे येतात. इकडे तिकडे न पाहता आपल्या ध्येयावर आपल्या उद्दिष्टावर वृश्चिक राशीच्या व्यक्‍तींची नजर असते. त्यामुळे त्या चिकाटीने, परिश्रमाने आपले काम पूर्ण करण्यात, ध्येयामध्ये सफल होतात, यशस्वी होतात ,वेगवेगळे डॉक्टर्स, केमिस्ट, वृश्चिक राशीचे किंवा वृश्चिक लग्नाची असतात .कोणाच्याही विचारांची पर्वा न करता वाटते जे आवडे येतील त्यांना बाजूला करून निर्धाराने वृश्चिक राशीच्या व्यक्ती यशस्वी होतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती जीवनात यशस्वी होतात. औषधे, लोखंड, पोलाद या सर्वांत ठिकाणी काम करणारे लोक वृश्चिक राशीचे आढळतात तसेच दारुगोळा, स्फोटक पदार्थाच्या कारखाने, दारू, कोकम, भांग, गांजा अशा मादक पदार्थ ज्या ठिकाणी वृश्चिक राशीच्या व्यक्ती आढळून येतात. धनु धनु राशीच्या व्यक्ती या अत्यंत प्रामाणिक असतात. धनु रास सुद्धा द्विस्वभावी राशी आहे. द्विस्वभावी असणाऱ्या व्यक्तीचा मोठा दोष म्हणजे त्यांचा निर्णय लवकर होत नाही. व्यवसायामध्ये धरसोड असते, नोकरीमध्ये धरसोड असते, त्यांना नोकरी नको असते, स्वतंत्र्याची आवड असते. परंतु त्यांचा प्रामाणिकपणा, संत प्रवृत्ती यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठ्या पदावर ते प्रामाणिकपणे काम करतात. काही वेळा नोकरी करतात. काही वेळा स्वतंत्र व्यवसाय करतात. सरळ मार्गाने चालणे, प्रामाणिकपणे काम करणे, खोटेपणा न करणे व आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहूनच धनू राशीच्या व्यक्ती काम करतात. सचोटी, प्रामाणिकपणा, खरेपणा, न्याय याविषयी धनू व्यक्ती प्रसिद्ध असतात. सार्वजनिक संस्था, धार्मिक संस्था, सेवाभावी संस्था अशा ठिकाणी धनू व्यक्ती यशस्वी होतात. शाळा ,महाविद्यालये, विद्यापीठे, उच्च संशोधन, सर्व शिक्षणक संस्था, शिक्षक, प्राध्यापक ,शालाप्रमुख, प्राचार्य, गुरुकुल, संशोधक, शास्त्रज्ञ या सर्व ठिकाणी धनू राशीच्या व्यक्ती आढळतील. त्याचप्रमाणे न्यायाधीश, वकील, परराष्ट्र वकील, जीवनामध्ये उच्च स्थान ,मानाचे स्थान ,आदराचे स्थान प्राप्त करणाऱ्या व्यक्ती धनु राशीच्या असतात. धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालय, धार्मिक ग्रंथ, उपासना, तपश्चर्या या सर्व ठिकाणी धनू राशीच्या व्यक्ती आढळतील. मकर मकर ही अत्‍यंत यशस्वी रास आहे.मकर राशीकडे काटकसरीपणा आहे.नियमीतपण आहे. काटेकोरपणा आहे. अत्यंत व्यवहारी अशी ही रास आहे. प्रत्येक ठिकाणी त्या वस्तूची किंमत पाहून, अनेक ठिकाणी तपास करून मगच त्या व्यक्ती खरेदी करतात. मकर राशीच्या स्त्रिया किंवा पुरुष हे कुटुंबात यशस्वी होतात. प्रपंच काटकसरीने करतात. त्यांच्याकडे कामाचा उरक चांगला असतो. मकर राशीच्या व्यक्ती गतिमानाने पुढे येतात. त्यांना कामाचा कंटाळा नसतो. त्यांच्याकडे संघटन कौशल्य, दूरदृष्टी, चिकाटी, मेहनतीपणा व आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून काम करण्याची यांची पद्धत असते. त्यामुळे व्यवसायात मकर राशीच्या व्यक्ती यशस्वी होतात. सर्व कामगार शेतकरी, मजूर, खाणीत काम करणारे लोक मकर राशीचे असतात. गुरांचा व्यवसाय करणारे, धान्यांचा व्यवसाय करणारे, गोठे, पशु पालन ,शेतीचे सर्व व्यवसाय, इमारती साठी लागणारे लाकूडा व्यवसाय करणारे, खडी, वाळू ,कोळसा, पिठाची चक्की, दीर्घकाळ चालणाऱ्या कामाच्या ठिकाणी असणारी व्यक्ती मकर राशीची असते. कुंभ कुंभ रास ही वायुराशी आहे कुंभेकडे विद्वाता आहे, बुद्धिमत्ता आहे, कुंभ राशीच्या व्यक्ती कोणत्याही घटनेच्या, कोणत्याही प्रसंगाच्या, कोणत्याही विषयाच्या तळाशी जाते. सत्याचा शोध करणे व कोणत्याही विषयाचा परिपूर्ण अभ्यास करणे हे कुंभ राशीचे वैशिष्ट्ये आहे. कुंभ राशीच्या व्यक्ती चौफेर विचार करतात, खोलवर विचार करतात, अनेक संशोधन क्षेत्रांमध्ये, वेगवेगळ्या विज्ञानाच्या संस्थेमध्ये कुंभ राशीच्या व्यक्ती आढळतील. त्यांचा प्रामाणिकपणा, सरळपणा, सज्जनपणा, सुसंस्कृतपणा यामुळे कुंभ व्यक्ती जगामध्ये आपोआप मोठेपण मिळते. लोकांचा विश्वास संपादन करण्यात कुंभ राशीच्या व्यक्तींचा हात कोणी धरू शकणार नाही. इमारतीचे लाकूड, तेल ,तेलाच्या गिरणी ,भूगर्भातील तेल, खडी, वाळू, कोळसा, पिठाची चक्की, सर्व प्रकारचे तेलचे व्यवसाय करणारे लोक, तसेच जुन्या ग्रंथाविषयी धर्माविषयी परंपरेविषयी अभ्यास करणारे लोक, मोठमोठे ऋषी मनी आचार्य योगी साधुसंत अध्यात्मिक जीवना विषयी अभ्यास करणारे सर्व व्यक्ती कुंभ राशीच्या आढळतात.खूप मोठ्या वर्षाचा,दीर्घ पल्ल्याचा, दूरवरचा असा जर काही प्रकल्पाचे असेल,अशा ठिकाणी काम करणार्‍या व्यक्ती कुंभ राशीच्या आसतात. मीन मीन रास ही द्विस्वभाव रास आहे त्यामुळे मिथुन, कन्या, धनु या राशीच्या प्रमाणे मीन राशीच्या व्यक्तींचा निर्णय लवकर होत नाही. मीन राशीच्या व्यक्ती अत्यंत भावनाप्रधान असतात. त्यांची मन:स्थिती अत्यंत हळूवार असते. कोमल असते त्यांच्याकडे कणखरपणा नसतो, दणकटपणाचा अभाव असतो, त्यामुळे मीन राशीच्या व्यक्ती मोठ्या प्रमाणावर पुढे येणार नाहीत. व्यवसायाचा ताणतणाव त्यांना झेपणार नाही. मीन राशीच्या व्यक्ती शिक्षक, प्राध्यापक, न्यायाधीश व साहित्यिक क्षेत्रात अधिक आढळून येतात. तसेच सर्व शिक्षण संस्था शिक्षक ,प्राध्यापक, शालाप्रमुख, प्राचार्य ,गुरुकुल, रुग्णालय, धार्मिक ग्रंथ, उपासना, अध्यात्मिक, मंदिरे, मशीद, धार्मिक संस्था या ठिकाणी सर्व मीन राशीच्या व्यक्ती आढळून येतील. सर्च व रिसर्च ज्योतिष ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन रंजनिकांत हजारे 91 75 12 19 34